
मराठी भाषा गौरव पुरस्काराने एडवोकेट आकाश भाऊ कांबळे यांचा सन्मान
या प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते व मराठी भाषा प्रेमी उपस्थित होते. एडवोकेट आकाश भाऊ कांबळे यांनी मराठी भाषा आणि सामाजिक क्षेत्रात केलेल्या कार्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
पुणे : मराठी भाषा संवर्धन व प्रसारासाठी केलेल्या कार्याची दखल घेत एडवोकेट आकाश भाऊ कांबळे यांना मराठी भाषा गौरव पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार पुण्याचे उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.