बोरगावात हर हर महादेव यात्रेला उत्साहात प्रारंभ

बोरगाव (दे.) येथे हर हर महादेव यात्रेला उत्साहात प्रारंभ

बोरगाव (ता. अक्कलकोट, जि. सोलापूर) : येथील ग्रामदैवत श्री हर हर महादेव यात्रेनिमित्त भव्य धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून रविवार दि. २९ मार्च २०२६ पासून यात्रेला उत्साहात प्रारंभ झाला आहे. ग्रामस्थांसह परिसरातील भाविकांची मोठी उपस्थिती अपेक्षित आहे.

यात्रेनिमित्त विविध धार्मिक विधी व सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी आयोजित करण्यात आली आहे.

दि. २९ मार्च रोजी रात्री ९ वाजता सामाजिक व कौटुंबिक कन्नड नाटक “धनिकर दौर्जन्य” अर्थात “अण्णन कण्णीरू” याचा प्रथम प्रयोग सादर करण्यात येणार आहे.

दि. ३० मार्च रोजी सकाळी वृद्राभिषेक, सायंकाळी ५ वाजता रथास कळसारोहण, सायं. ७ वाजता नंदीध्वज मिरवणूक, तर रात्री ९ वाजता रथोत्सव व डफावरील गाण्यांचा कार्यक्रम होणार आहे. यावेळी नूतन जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांसह गावातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.

दि. ३१ मार्च रोजी सकाळी डफावरील गाणे, सायं. ४ वाजता जंगी कुस्ती स्पर्धा आणि रात्री ९ वाजता नाटकाचा द्वितीय प्रयोग होणार असून यात्रेचा समारोप करण्यात येणार आहे. समारोपाच्या दिवशी विशेष पूजा, महाप्रसाद व विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यात्रेनिमित्त गावात आकर्षक रोषणाई, सजावट व भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे. यात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी हर हर महादेव यात्रा पंच कमिटी व ग्रामपंचायत बोरगाव यांनी विशेष परिश्रम घेतले आहेत.


✍️ प्रतिनिधी – बोरगाव : विठ्ठलराव वाघमारे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *