रुग्णसेवेतून कमावला जनतेचा विश्वास : डॉ. रावसाहेब वाघमारे

प्रसिद्ध एक्यूप्रेशर तज्ञ डॉ. रावसाहेब वाघमारे यांचे आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य

पुणे : नैसर्गिक उपचार पद्धती, योग, एक्यूप्रेशर व पर्यायी आरोग्य सेवांच्या माध्यमातून रुग्णांना निरोगी जीवनाचा मार्ग दाखवणारे प्रसिद्ध एक्यूप्रेशर तज्ञ डॉ. रावसाहेब वाघमारे यांनी आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे.

डॉ. वाघमारे हे गोल्ड मेडलिस्ट एक्यूप्रेशर तज्ञ असून त्यांनी योग, निसर्गोपचार आणि पर्यायी वैद्यकीय क्षेत्रात विशेष प्राविण्य मिळवले आहे. पुणे व मुंबई येथे त्यांनी अनेक योग शिबिरे, आरोग्य जनजागृती कार्यक्रम तसेच प्रशिक्षण वर्गांचे यशस्वी आयोजन केले आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून ते एक्यूप्रेशर, कपिंग थेरपी, टोक सेन थेरपी, स्पाईन रिलॅक्सेशन, मर्म चिकित्सा व योग प्रशिक्षणाच्या माध्यमातून हजारो रुग्णांना उपचार व मार्गदर्शन करत आहेत. भारतासह विविध देशांतील आधुनिक व पारंपरिक उपचार पद्धतींचा त्यांनी सखोल अभ्यास केला असून त्याचा लाभ अनेक रुग्णांना होत आहे.

आरोग्य क्षेत्रातील सातत्यपूर्ण सेवा, रुग्णांप्रती असलेली आत्मीयता आणि नैसर्गिक उपचारांबाबतची जनजागृती यामुळे डॉ. रावसाहेब वाघमारे यांचे नाव आज विश्वासार्ह आरोग्य तज्ञ म्हणून ओळखले जात आहे. त्यांच्या कार्याबद्दल विविध स्तरातून कौतुक होत असून भविष्यातही ते आरोग्य सेवेसाठी अधिक व्यापक स्वरूपात कार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

— लोकसेवा न्यूज

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *