सामाजिक बांधिलकीचा आदर्श : वृद्धाश्रमात नाश्ता वाटप करून अरविंद सर यांचा वाढदिवस साजरा

लोकसेवा न्यूज

वृद्धाश्रमात नाश्ता वाटप करून वाढदिवस साजरा

आळंदी, दि. १ जून : पत्रकार उत्कर्ष समिती, पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष अरविंद सर यांच्या वाढदिवसानिमित्त आळंदी येथील वृद्धाश्रमात ज्येष्ठ नागरिकांना नाश्ता वाटप करण्यात आला. सामाजिक बांधिलकी जपत हा उपक्रम राबविण्यात आला.

वाढदिवसाचे औचित्य साधून वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधण्यात आला तसेच त्यांना नाश्ता वाटप करून शुभेच्छा देण्यात आल्या. या उपक्रमामुळे वृद्धाश्रमातील ज्येष्ठांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला.

अरविंद सर हे पत्रकारिता क्षेत्राबरोबरच विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेत असून त्यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे उपस्थितांनी स्वागत केले. समाजातील गरजू व ज्येष्ठ नागरिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

यावेळी उपस्थितांनी अरविंद सर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या हातून भविष्यातही अशीच समाजसेवा घडत राहो, अशी सदिच्छा व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *