नागपूरात मायाताई इवनाते यांचा भव्य नागरी सत्कार; फडणवीस-गडकरींची प्रमुख उपस्थिती

राज्यसभेच्या खासदार मायाताई इवनाते यांचा नागरी सत्कार उत्साहात

नागपूर : राज्यसभेच्या नवनिर्वाचित खासदार मायाताई इवनाते यांचा नागरी सत्कार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात पार पडला.

या सोहळ्यास राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक वुईके, आमदार कृष्णा खोपडे, महापौर नीता ठाकरे, माजी आमदार देवराव होळी व सुधाकरराव देशमुख यांची उपस्थिती होती.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “आदिवासी समाजाला शिक्षण व रोजगाराच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर संधी मिळत असून हा समाज नव्या उर्जेने पुढे जात आहे. त्यामुळे आता हा समाज मागे वळून पाहणार नाही.” त्यांनी मायाताई इवनाते यांनी या संधीचा उपयोग करून समाजासाठी उल्लेखनीय कार्य करावे, असे आवाहन केले.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही आदिवासी समाजाच्या प्रगतीचा उल्लेख करत, “समाजाला दिशा देण्याची जबाबदारी मायाताईंसारख्या नेतृत्वावर आहे. आज समाज त्यांच्याकडे मोठ्या अपेक्षेने पाहत आहे,” असे मत व्यक्त केले.

या कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सत्कारास उत्तर देताना मायाताई इवनाते म्हणाल्या की, “आदिवासी समाजाचे प्रश्न संसदेत मांडून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मी कटिबद्ध आहे. देशाच्या प्रगतीत आदिवासी बांधवांचा मोठा वाटा असेल.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *