योगगुरु डॉ. धनंजय जगताप यांचा ‘इंदिरा गांधी राष्ट्रीय समाजरत्न पुरस्कार 2025’ ने गौरव

पुणे : समाजकार्यात आणि योग क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल योगगुरु डॉ. धनंजय जगताप यांना ‘इंदिरा गांधी राष्ट्रीय समाजरत्न पुरस्कार 2025’ प्रदान करण्यात आला आहे.

हा मानाचा सन्मान ठाणे जिल्हा ग्रामीण शिक्षण संस्था (सामाजिक विभाग आयोजित) व भारत सरकार निती आयोग आणि आय एस ओ प्रमाणित संस्थेमार्फत जाहीर करण्यात आला आहे. समाजाच्या विविध क्षेत्रात कौशल्य, प्रामाणिकता आणि निष्ठेने कार्य करून समाजहितासाठी दिलेले त्यांचे योगदान लक्षणीय ठरले आहे.

पुरस्कार वितरण सोहळा 31 ऑक्टोबर 2025 रोजी पार पडला. या कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष डॉ. वीरेंद्र भोईर यांच्या हस्ते योगगुरु डॉ. धनंजय जगताप यांना सन्मानपत्र व पुरस्कार प्रदान करण्यात आला.

समाज आरोग्य आणि योग जनजागृती क्षेत्रात त्यांनी केलेले सातत्यपूर्ण कार्य प्रेरणादायी असल्याचे गौरवपत्रात नमूद करण्यात आले आहे.
“`

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *