योग व आरोग्य क्षेत्रातील मान्यवरांना ‘योग व आरोग्य रत्न’ पुरस्कार – नावांची मागणी

योग व आरोग्य क्षेत्रातील मान्यवरांना “योग व आरोग्य रत्न” पुरस्कार – नावांची मागणी

पुणे – समाजात योग, नैसर्गिक उपचार, आयुर्वेद, नॅचरोपॅथी व आरोग्य जनजागृती क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करण्यासाठी लोकसेवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने विविध “योग व आरोग्य रत्न” पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.

समाजात आरोग्यदायी जीवनशैलीचा प्रसार करणाऱ्या तसेच योग, निसर्गोपचार, आयुर्वेद व समाजसेवा क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींना प्रोत्साहन देण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

या अंतर्गत खालील पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत –

  • योग रत्न पुरस्कार
  • नॅचरल हीलिंग रत्न पुरस्कार
  • आरोग्य प्रेरक रत्न पुरस्कार
  • योग समाजसेवी रत्न पुरस्कार
  • हेल्थ इनोव्हेशन रत्न पुरस्कार

लोकसेवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य या संस्थेचे सचिव डॉ. रावसाहेब वाघमारे यांनी सांगितले की, समाजात अनेक व्यक्ती शांतपणे आरोग्य, योग व समाजसेवा क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करत आहेत. अशा प्रेरणादायी व्यक्तींना समाजासमोर आणून त्यांच्या कार्याचा सन्मान करण्याच्या उद्देशाने हे पुरस्कार दिले जाणार आहेत.

महाराष्ट्रातील योग शिक्षक, डॉक्टर, निसर्गोपचार तज्ञ, समाजसेवक तसेच आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींची नावे या पुरस्कारासाठी सुचविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

इच्छुक व्यक्तींनी किंवा कोणाला पुरस्कारासाठी नामनिर्देशन करायचे असल्यास संबंधित व्यक्तीचे नाव, कार्याचा संक्षिप्त तपशील व संपर्क क्रमांक व्हॉट्सअ‍ॅपद्वारे 9960604477 या क्रमांकावर पाठवावा, असे आवाहन लोकसेवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *