साई सिद्ध योग फाउंडेशन येथे जागतिक योग दिन उत्साहात साजरा.

साई सिद्ध योग फाउंडेशन येथे जागतिक योग दिन उत्साहात साजरा
पुणे प्रतिनिधी: आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून आज शनिवार दिनांक 25 जून साई सिद्ध योग फाउंडेशन येथे सायंकाळी सुमारे 35 ते 40 योग शिक्षकांनी योगासनाच्या प्रात्यक्षिकांची सादरीकरण केले.
या कार्यक्रमाला साई सिद्ध योग फाउंडेशन चे संस्थापक (चेअरमन) मा. श्री डॉ. धनंजय जगताप सर उपस्थित होते. योग गुरु डॉ. धनंजय जगताप सर यांच्या प्रमुख उपस्थित योग प्रात्यक्षिक कार्यक्रम संपन्न झाला.
साई सिद्ध योग फाउंडेशन योग स्कूल मध्ये 9वा जागतिक योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्राणायाम, वृक्षासन, वीरभद्रासन, अशा विविध योगासनाचा अर्थ व त्याचे महत्त्व समजावून सांगून प्रात्यक्षिकासह सादर करण्यात आली सर्व योग शिक्षकांनी योगा डे उत्साहात साजरा केला. व तसेच सर्व योग शिक्षकांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी उपस्थित संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. धनंजय जगताप, डॉ. सुजय NK डॉ. उर्वशी अग्रवाल, ज्ञानेश्वरी मॅडम, डॉ. बाळा वाघमारे, गायकवाड सर, व तसेच सर्व योगशिक्षक आणि साधक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *