सोलापूरचा विजय! राज्यसेवा परीक्षेत विजय लामकाने महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर
सोलापूर : सोलापूर जिल्ह्याचा डंका पुन्हा एकदा राज्यभर वाजला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) राज्यसेवा परीक्षा 2024 मध्ये सोलापूर जिल्ह्याचे सुपुत्र विजय लामकाने यांनी महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावून अभूतपूर्व यश संपादन केले आहे.
त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात आनंदाचे वातावरण आहे. विविध सामाजिक, शैक्षणिक व राजकीय स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
विजय लामकाने यांनी सातत्य, जिद्द आणि कठोर परिश्रम यांच्या जोरावर हे यश मिळवले असून, त्यांचा हा प्रवास अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
सोलापूर जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी ही अभिमानास्पद कामगिरी मानली जात असून, सर्व सोलापूरकर त्यांच्या या पराक्रमाचा अभिमान वाटतो.

– सोलापूर प्रतिनिधी, लोकसेवा न्यूज