सोलापूर पूर्व जिल्ह्याची भाजप सदस्य नोंदणीत प्रथम क्रमांकाची कामगिरी
मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भाजपा सोलापूर जिल्हा पूर्वचे जिल्हाध्यक्ष आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचा गौरव
अक्कलकोट प्रतिनिधी: महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाच्या संघटन पर्व सदस्य नोंदणी अभियानात सोलापूर पूर्व जिल्ह्याने ६६.६८ टक्के नोंदणीसह पहिला क्रमांक मिळवला आहे. या निमित्ताने एसएनडीटी महाविद्यालय, मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भाजपा सोलापूर जिल्हा पूर्वचे जिल्हाध्यक्ष आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचा सत्कार करण्यात आला.
या मोहिमेत सिंधुदुर्ग जिल्हा ६४.६५ टक्के नोंदणीसह दुसऱ्या स्थानी, तर सोलापूर पश्चिम जिल्हा ६२.७५ टक्के नोंदणीसह तिसऱ्या स्थानी राहिला. तसेच, अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातून ८४ हजार ७७९ सदस्य सदस्य नोंदणी (१०८.६८ टक्के) झाल्याची माहितीही देण्यात आली.

कार्यक्रमाला भाजपा राष्ट्रीय सह-संघटन मंत्री शिवप्रकाश, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील उपस्थित होते. पक्षाच्या वतीने राज्यभर ही मोहीम राबविण्यात येत असून, यामध्ये विविध जिल्ह्यांमधून मोठ्या प्रमाणात सदस्य नोंदणी झाली आहे.