श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात कालिपुत्र कालिचरण महाराज यांचा सत्कार

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात कालिपुत्र कालिचरण महाराज यांचा सत्कार

अक्कलकोट (प्रतिनिधी) : श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या कार्याचे कौतुक करत कालिपुत्र कालिचरण महाराज यांनी संस्थेच्या अद्वितीय सेवेचा गौरव केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याचे कार्य अमोलराजे जन्मेजयराजे भोसले व त्यांचे सहकारी पुढे नेत असल्याचा त्यांनी अभिमान व्यक्त केला.

त्यांच्या सत्कार समारंभात श्री श्री श्री १००८ विश्वानंद सरस्वती स्वामी महाराज मठाधिश बसवकल्याण यांचा देखील सन्मान करण्यात आला. यावेळी अन्नछत्र मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे भोसले यांच्या हस्ते श्रींची मूर्ती, कृपावस्त्र आणि पुष्पहार अर्पण करून सत्कार करण्यात आला.

तत्पूर्वी, श्री तुळजाभवानी माता मंदिरात कालिपुत्र कालिचरण महाराज यांच्या हस्ते पूजन संपन्न झाले. या प्रसंगी संस्थेचे पदाधिकारी, भक्तगण आणि सेवेकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *