जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोरगाव देशमुख येथे शाळा व्यवस्थापन समितीची पुनर्रचना; अनिल गंगाधर जिरगे अध्यक्षपदी

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोरगाव देशमुख येथे शाळा व्यवस्थापन समितीची पुनर्रचना; अनिल गंगाधर जिरगे अध्यक्षपदी

बोरगाव देशमुख | प्रतिनिधी | लोकसेवा न्यूज

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, बोरगाव देशमुख येथे शाळा व्यवस्थापन समितीची पुनर्रचना करण्यात आली. नूतन पुरुष व महिला प्रतिनिधींच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत अनिल गंगाधर जिरगे यांची अध्यक्षपदी, तर सौरजिया सलीम पठाण यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली.

या पुनर्रचित समितीत बाबासाहेब विठ्ठलराव वाघमारे, युवराज चंद्रकांत घोडके, बसवराज कल्लाप कल्याणी, प्रकाश घोडके, सौ पूजा महादेव कोळी, सौ रुपाली काशिनाथ कलशेट्टी, सौ रोहिणी शिवराम गावडे, सौ यास्मिन सलीम बागवान, सौ पल्लवी सिद्धाराम मटकी व सौ दिपाली लक्ष्मण कामशेट्टी यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.

नवीन शाळा व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून शाळेतील शैक्षणिक गुणवत्ता वाढवणे, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबवणे तसेच पालक व शिक्षक यांच्यात समन्वय वाढवण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.

अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर अनिल गंगाधर जिरगे यांनी सर्व सदस्यांचे आभार मानत शाळेच्या प्रगतीसाठी एकत्रितपणे काम करण्याचे आश्वासन दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *