सांगवी तालुक्यात अल्पसंख्यांक कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

अल्पसंख्यांक कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश*

सांगवी (ता. अक्कलकोट) | प्रतिनिधी: विठ्ठलराव वाघमारे

सांगवी तालुक्यातील अल्पसंख्यांक समाजातील कार्यकर्त्यांनी माननीय सरपंच भोसले साहेबांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. हा प्रवेश सोहळा माननीय आमदार सचिन दादा कल्याण शेट्टी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

आमदार सचिन दादांच्या नेतृत्वाखाली झालेल्या विविध विकासकामांवर विश्वास व्यक्त करत गावातील पदाधिकारी व अल्पसंख्यांक समाजातील अनेक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. सांगवी गावाचा सर्वांगीण विकास, रोजगारनिर्मिती, पायाभूत सुविधा आणि सामाजिक न्यायासाठी भाजप कटिबद्ध असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

या प्रवेशामुळे परिसरातील राजकीय समीकरणांमध्ये सकारात्मक बदल घडून येईल, तसेच आगामी काळात विकासाला अधिक गती मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *