दिव्यांग कल्याण मंत्रालय दिव्यांगाच्या दारी या अभियाना संदर्भात अक्कलकोट येथे महत्त्वाची बैठक संपन्न

दिव्यांग कल्याण मंत्रालय दिव्यांगाच्या दारी या अभियाना संदर्भात अक्कलकोट येथे महत्वाची बैठक संपन्न…
“””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””
अक्कलकोट प्रतिनिधी,
प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन अक्कलकोट तालुक्याच्या वतीने पंचायत समिती कार्यालय अक्कलकोट येथे दिव्यांग कल्याण मंत्रालय दिव्यांगाच्या दारी या अभियाना संदर्भात तालुक्यातील दिव्यांग बांधवांची महत्वाची बैठक आयोजित करण्यात आलेली होती. यावेळी शहराध्यक्ष अमर शिरसाठ यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच तालुकाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य, नितीन माने. यांच्या अध्यक्षतेखाली दिव्यांग बांधवांना संस्थेचे आयडी व टीशर्ट वाटप, करून दिव्यांग कल्याण मंत्रालयाचे निर्माते तथा दिव्यांग कल्याण मंत्री वंदनीय बच्चू भाऊ कडू यांच्या उपस्थितीत. २० सप्टेंबर २०२३. सोलापूर जिल्हात होणाऱ्या दिव्यांग कल्याण विभाग दिव्याच्या दारी ह्या अभियानामध्ये अक्कलकोट शहर व ग्रामीण भागातील सर्व दिव्यांग बांधवांना प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलनाच्या माध्यमातून सर्व तालुक्यातील ग्रामपंचायतीचे सरपंच/ ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी यांनी आपापल्या परीने गावातील सर्व दिव्यांग बाधवाचे नोंदणी फार्म भरून तात्काळ पंचायत समितीस सादर करावे,असे पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मा. सचिन खुडे साहेब यांच्या वतीने सुचना देण्यात आले. शहरातील दिव्यांग बांधवांना सुध्दा या अभियाना मध्ये घेऊन येण्याकरीता नगरपरिषद अक्कलकोट चे मुख्य अधिकारी यांना ही सुचना देण्यात आले. यावेळी ता उपाध्यक्ष तुकाराम साखरे,शहराध्यक्ष स्वामिनाथ धनशेट्टी, यांनी दिव्यांग बांधवांना मार्गदर्शन केले. खालील विषयांवर सविस्तर माहिती देऊन आवाहन करण्यात आले.
.तरी तालुक्यातील सर्व दिव्यांग बांधवांनी शैक्षणिक कागदपत्रे तसेच दिव्यांग शेतकरी बांधवांनी शेतीचा उतारा सोबत घेऊन येणे.
वंदनीय बच्चू कडू साहेब यांच्या आदेशाने खालील विषयांवर चर्चा करण्यात येणार आले.
1 दिव्यांग बांधव शासकीय नौकरी संदर्भ.
2 दिव्यांग बांधव यांच्यासाठी लघुउद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज.
3 दिव्यांग शेतकरी लघुउद्योग विकास कर्ज.
तसेच दिव्यांग बांधवांना इतर अनेक क्षेत्रात काम करुन पैसा कमावला जाऊ शकतो या अनेक विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे तसेच शहराध्यक्ष अमर भाऊ शिरसाठ सलगरचे ग्रामपंचायत सदस्य, अमोल पुटगे, दर्शनाळचे ग्रामपंचायत सदस्य युवा नेते आकाश माने, महिला ता. अध्यक्षा फातिमा बेग यांच्या हस्ते सर्व दिव्यांग बांधवांना आयडी व टीशर्ट वाटत करण्यात आले. यावेळी
*तालुकाध्यक्ष नितीन क माने
ता. संपर्क प्रमुख
आनंदराव जाधव
सचिव
सिद्धाराम राजमाने
कार्याध्यक्ष
सिद्धाराम बंडगर,
ता. संघटक
परमेश्वर स्वामी
सतीष कोळी, सुरेश पत्रीगिडा, आदिंसह प्रमुख पदाधिकारी व दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *