शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यासोलापूर शहराध्यक्षपदीमहेश गादेकर यांची नियुक्ती**

शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सोलापूर शहराध्यक्षपदी महेश गादेकर यांची नियुक्ती**

सोलापूर (प्रतिनिधी): शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सोलापूर शहराध्यक्षपदी महेश गादेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे सोलापूरच्या राजकीय वर्तुळात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

कोण आहेत महेश गादेकर?

महाविद्यालयीन जीवनापासूनच त्यांनी समाजकारण आणि राजकारणात सक्रिय सहभाग घेतला. 1992 साली त्यांनी पक्षीय राजकारणास सुरुवात केली. युवक काँग्रेसमध्ये उपाध्यक्ष म्हणून कार्य केल्यानंतर 1996 साली शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष झाले.
1997 च्या महापालिका निवडणुकीत त्यांनी तरुण कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देऊन पक्षाचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आणले.

1999 साली राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर, गादेकर यांनी शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष म्हणून जबाबदारी स्वीकारली.
2010 साली ते सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष झाले आणि 2012 च्या महापालिका निवडणुकीत पक्षाचे 17 नगरसेवक निवडून आणले.
2014 मध्ये त्यांनी सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली.

सामाजिक उपक्रम आणि जनसेवा

शरदचंद्र पवार यांच्या संसदीय कारकिर्दीला 50 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सोलापुरात पहिला भव्य कार्यक्रम आयोजित करण्याचे श्रेय त्यांना जाते.
शहराध्यक्ष असताना त्यांनी “फिरता दवाखाना” ही संकल्पना पाच वर्षे राबवत सुमारे पाच लाख लोकांवर मोफत उपचार केले.

क्रीडा क्षेत्रातील योगदान

राजकारणाबरोबरच गादेकर हे क्रीडा क्षेत्रातही तितकेच सक्रिय आहेत.
त्यांना शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्राप्त झाला आहे.
ते सध्या महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशनचे उपाध्यक्ष, तसेच सोलापूर शहर जिल्हा खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष आहेत.
याशिवाय ते सोलापूर शहर व जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून कार्यरत असून, 2015 साली सोलापुरात राष्ट्रीय खो-खो स्पर्धेचे आयोजन त्यांनी केले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *