लोणावळा retreat या तीन दिवसीय आध्यात्मिक संमेलनासाठी लोकसेवा न्यूज ची media partnership होती. यानिमित्ताने मला लोणावळा येथे या संमेलनाचा भाग होता आलं
याप्रसंगी आध्यात्मिक, ज्योतिष शास्त्र, वास्तुशास्त्र इत्यादी क्षेत्रातील मान्यवर मंडळी तसेच अभ्यासू ज्योतिषशास्त्राबद्दल उत्कंठा असलेली मंडळीही उपस्थित होती. मान्यवर पाहुण्यामध्ये धर्मगुरू डॉ. एच एस रावत, डॉ. चंद्रशेखर शास्त्री, स्वामीभक्त मोहन बुवा रामदासी, आचार्य अनिल वत्स, आचार्य मनवेंद्र सिंग, डॉ. रविराज अहिरराव, डॉ. सूर्यकांत राऊळ, डॉ. सचिन लोहिया, डॉ. बिंदू. योगाचार्य डॉ. धनंजय जगताप, डॉ. सुजय एन, डॉ. रावसाहेब वाघमारे, के खुराना उपस्थित होते. या सगळ्या मान्यवरांनी सनातन धर्म आणि त्याचा प्रचार, ज्योतिषशास्त्र काल, आज, उद्या, ज्योतिषशास्त्रातील नवीन बदल, वास्तु परीक्षणातील नवीन समस्या आणि त्यांचे उपाय, हस्तरेखा आणि भविष्य, भृगुनाडी आणि आरोग्य, या आणि अनेक विषयांवर आपलं बहुमोल असं मार्गदर्शन केलं. मान्यवर गुरुजनांचे विचारमंथन ऐकताना समृद्ध झाल्यासारखे वाटले. उपस्थित ज्योतिष शास्त्राच्या अभ्यासकांनी आपले मनोगत आमच्या लोकसेवा न्यूज माध्यमातून सांगितले. पद्मावती इंटरनॅशनल spiritual या संस्थेतर्फे आम्हाला मीडिया पार्टनर म्हणून सन्मानित करण्यात आलं. तसंच स्वामीभक्त मोहन बुवा रामदासी यांनी आणि वर्ल्ड मिस्टीक सायंस इंस्टिट्यूटचे अध्यक्ष आणी कुलगुरु डॉ. सुर्यकांत राऊळ यांनी श्रीसमर्थांचा प्रसाद दिला त्यामुळे आयुष्याच सार्थक झाल्यासारखं वाटलं. एकंदरीतच लोणावळ्यासारख्या निसर्ग संपन्न आणि योग साधनेसाठी, तपश्चर्येसाठी निवडलेल्या या पाटीदार वास्तूमध्ये आध्यात्मिक स्नेहसंमेलन उत्कृष्टरित्या साकार झाले. त्यासाठी आयोजक सुब्बु क्रिश आणि त्यांच्या पत्नी तसंच मित्रपरिवार यांचे खूप खूप आभार. पुन्हा अशाच आध्यात्मिक उन्नतीचा योग घडावा ही श्री चरणी प्रार्थना..
लोकसेवा न्यूज
