लोकसेवा योगा इन्स्टिट्यूटतर्फे योग शिक्षक प्रशिक्षण अभ्यासक्रमास प्रारंभ(प्रतिनिधी : विठ्ठलराव वाघमारे, लोकसेवा न्यूज)

लोकसेवा योगा इन्स्टिट्यूटतर्फे योग शिक्षक प्रशिक्षण अभ्यासक्रमास प्रारंभ

पुणे :
लोकसेवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संचलित लोकसेवा योगा इन्स्टिट्यूट यांच्या वतीने योग क्षेत्रात करिअर घडवू इच्छिणाऱ्या युवक-युवतींसाठी योग शिक्षक प्रशिक्षण अभ्यासक्रमास (Yoga Teacher Training Course) सुरुवात करण्यात आली आहे.

या अभ्यासक्रमामध्ये योगासन, प्राणायाम, ध्यान, षटक्रिया, योगतत्त्वज्ञान, मानवी शरीरशास्त्र तसेच नैसर्गिक उपचार पद्धतींचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण दिले जाणार आहे. अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार असून त्यांना योग शिक्षक, प्रशिक्षक तसेच स्व-रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध होणार आहेत.

लोकसेवा योगा इन्स्टिट्यूट ही ISO प्रमाणित संस्था असून येथे अनुभवी व तज्ञ प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण दिले जाते. संस्थेचे सचिव डॉ. रावसाहेब वाघमारे (BNYS, Acupressure Gold Medalist) यांनी आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत योगाचे महत्त्व वाढले असून समाजाच्या शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी अशा उपक्रमांची नितांत गरज असल्याचे मत व्यक्त केले.

सदर अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू असून मर्यादित जागा उपलब्ध आहेत. इच्छुकांनी अधिक माहितीसाठी लोकसेवा योगा इन्स्टिट्यूटशी संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

प्रतिनिधी : विठ्ठलराव वाघमारे लोकसेवा न्यूज

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *