लोकसेवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याची सामाजिक कार्यात उल्लेखनीय वाटचाल

लोकसेवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याची सामाजिक कार्यात उल्लेखनीय वाटचाल

महाराष्ट्र विशेष प्रतिनिधी : सामाजिक बांधिलकी जपत विविध समाजोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून कार्यरत असलेल्या लोकसेवा प्रतिष्ठान (सोलापूर) महाराष्ट्र राज्य या संस्थेची स्थापना व नोंदणी सन २०२२ मध्ये झाली असून, संस्थेचा रजिस्ट्रेशन क्रमांक ५११ आहे.

समाजातील गरजू, वंचित आणि सर्वसामान्य घटकांसाठी विविध उपक्रम राबविणे, सामाजिक जनजागृती निर्माण करणे तसेच शैक्षणिक व आरोग्यविषयक क्षेत्रात समाजोपयोगी कार्य करण्याच्या उद्देशाने संस्थेची वाटचाल सुरू आहे.

संस्थेच्या संस्थापक अध्यक्षपदी विठ्ठलराव वाघमारे, संस्थापक उपाध्यक्षपदी बाबासाहेब वाघमारे, खजिनदारपदी शितलताई बाबासाहेब वाघमारे, संस्थापक सहखजिनदारपदी छायाताई विठ्ठलराव वाघमारे तसेच संस्थापक सचिवपदी डॉ. रावसाहेब वाघमारे कार्यरत आहेत.

आगामी काळातही सामाजिक कार्याचा विस्तार करून अधिकाधिक नागरिकांपर्यंत समाजोपयोगी उपक्रम पोहोचविण्याचा संस्थेचा मानस आहे. लोकसेवा प्रतिष्ठानच्या कार्यामुळे सामाजिक क्षेत्रात सकारात्मक योगदान देण्याच्या दिशेने संस्थेची वाटचाल सुरू आहे.

लोकसेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, आरोग्यविषयक तसेच विविध समाजोपयोगी उपक्रमांना चालना देण्यात येत आहे. समाजातील विविध घटकांना एकत्रित करून जनहिताचे उपक्रम प्रभावीपणे राबविण्यावर संस्थेचा भर आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *