‘लोकसेवा जन स्पंदन’च्या संपादकीय मंडळाची निवड
पुणे प्रतिनिधी : लोकसेवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य या मान्यताप्राप्त संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा चेअरमन विठ्ठलराव वाघमारे, बाबासाहेब वाघमारे आणि डॉ. रावसाहेब वाघमारे यांची ‘साप्ताहिक लोकसेवा जन स्पंदन’च्या संपादकीय मंडळावर अनुक्रमे सहसंपादक, मुख्य संपादक आणि कार्यकारी संपादक म्हणून निवड करण्यात आली आहे.
लोकसेवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य ही संस्था नोंदणी क्रमांक ५११ अंतर्गत कार्यरत असून, सामाजिक क्षेत्रात विविध समाजोपयोगी उपक्रम राबवित आहे. सामाजिक कार्याची बांधिलकी आणि जनसामान्यांच्या प्रश्नांशी असलेली नाळ लक्षात घेऊन तिघांवर वृत्तपत्राच्या संपादकीय जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या आहेत.
या निवडीबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार आणि नागरिकांकडून तिन्ही पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
‘लोकसेवा जन स्पंदन’च्या माध्यमातून नागरिकांचे प्रश्न, सामाजिक व शैक्षणिक विषय, आरोग्यविषयक जनजागृती, ग्रामीण भागातील समस्या तसेच विविध समाजोपयोगी उपक्रमांना प्रभावी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. वस्तुनिष्ठ, निर्भीड आणि जनहिताची पत्रकारिता करण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे.