नवे विचार, नवी सुरुवात, सार्वजनिक आरोग्यासाठी देऊ या साथ

🔴रेड डॉट बॅग 🔴
नवे विचार, नवी सुरुवात, सार्वजनिक आरोग्यासाठी देऊ या साथ ..

पुणे प्रतिनिधी: (लोकसेवा न्यूज) नवरात्रीचा शुभारंभ यंदा थोड्या वेगळ्या विचाराने केला. कात्रज येथे एक भव्य अनाथालय आहे. जनसेवा अनाथालय. येथे जवळपास 200 पेक्षा जास्त अनाथ, निराधार मुल आहेत. श्रीमती शहा भाभी या तेथील ट्रस्टी आहेत. त्यांनी व त्यांच्या सर्व टीमने, सौ. कविता रासकर यांनी आम्हाला तेथे खूपच छान मदत केली. त्यामध्ये ज्या वयात येणाऱ्या व वयात आलेल्या अशा मुलींचे वर्गीकरण करून या मुलींना डिवाइन योगा अकॅडमी तर्फे वयात येताना नेमकं काय होतं व त्याचे लक्षणे काय ? ज्या मुली वयात आलेल्या आहेत त्यांना सुरुवातीचे चार दिवस स्वच्छतेची काळजी का व कशी घ्यायची याबद्दल मार्गदर्शन केले. या चार दिवसांमध्ये बऱ्याच जणी पोट दुखीने त्रस्त असतात तर काही जणी कमी आणि जास्त रक्तस्त्राव झाल्याने त्रस्त असतात. तेव्हा या सर्व मुलींना व्यायामाच्या कमतरतेमुळे आपले हार्मोन कसे इमबॅलेन्स होतात व आपल्याला हे सर्व त्रास का सुरू होतात याची माहिती देऊन त्याबद्दल कु. तन्वी वैद्य हिने या बद्दल चे योगा आसन करून दाखवले. डॉ. भाग्यश्री वैद्य यांनी मुलींना या सर्वांबद्दल योग्य मार्गदर्शन केले.
आता पाळीच्या वेळेस आपण जे पॅड वापरतो त्याची योग्य विलेवाट लावण्यासाठी रेड डॉट बॅगचा वापर का व कसा करायचा याची माहिती सो. अनिता माने यांनी दिली. त्यानंतर या सर्व मुलींना सॅनिटरी पॅड व रेड डॉट बॅग देऊन सर्व मुलींचे कन्या पूजन केले व अशा रीतीने थोड्या वेगळ्या पद्धतीने डिवाईन योगा अकॅडमी कडून नवरात्रीची अशी सुरुवात करण्यात आली.

                         डॉ. भाग्यश्री वैद्य.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *