नवरात्रीच्या उपवासाचे महत्त्व जाणून घ्या या वृत्ताचे आणखी काही नियम!

नवरात्रीच्या उपवासाचे महत्त्व जाणून घ्या या वृत्ताचे आणखी काही नियम!
पुणे प्रतिनिधी :

  *उपवासाचे महत्त्व*

आजच्या या लेखामध्ये मी तुम्हाला आरोग्याची खरी संपदा मिळवण्यासाठीचा एक अद्भुत व सोपा असा मंत्र सांगणार आहे. जो मंत्र की आपल्या पूर्वजांपासून सगळे GBजण जतन करत आलेले आहेत तो मंत्र म्हणजे उपास.
उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे राहणे किंवा असणे केवळ काही विशिष्ट पदार्थ खाणे म्हणजे उपवास नव्हे तर आपल्या ज्ञानेन्द्र्याच्या, कर्मेंद्रियाच्या आणि उभयात्मक मनाच्या जवळ जाणे म्हणजे उपवास करणे होय.
उपवास म्हटलं की साधारणतः सगळेजण दुप्पटच खातात. मग हा उपवास नेमका आपल्या शरीराला काय फायदा करून देतो, त्याची नेमकी कोणती पद्धत आहे, तो का करावा? कोणी करावा? व कोणी करू नये ? याबद्दल आज आपण पाहणार आहोत.
विस्कळीत जीवनामुळे आहार आराम आणि श्रम या बाबीतील साधारण नियमांचे पालन होत नाही. बालपण व तरुण वयात अ व्यवस्थित दिनचर्येचा परिणाम शरीरावर बराच होत असतो. पण, जीवनशक्ती भरपूर असल्यामुळे शरीर तो सहन करत असतो. आधुनिक जीवनाचे आकर्षण शरीर व मनाला अत्याधिक असल्यामुळे साधारण लोक शारीरिक क्षमतेच्या मर्यादेचे नीट पालन करू शकत नाहीत.
अनियमित तसेच चुकीचा आहार विहार याचा परिणाम सर्वात प्रथम पजनसंस्थेवर होतो. कामाच्या तणावामुळे प्रथम अधिक थकवा वाटू लागतो थकवा आलेला असताना जास्त खावेसे वाटते, शारीरिक श्रम कमी किंवा जास्त असल्यामुळे योग्य विश्रांतीच्या अभावामुळे भूक लागते किंवा अजिबातच लागत नाही. तरीही लोक आपला आहार पूर्वीप्रमाणेच ठेवण्याचा प्रयत्न करतात. तेव्हा नैसर्गिक साधे पदार्थ चवदार लागत नाहीत. तेव्हा, तळलेली पदार्थ, तुपकट पदार्थ, मसाल्याची पदार्थ आपण खातो. यामुळे पचनसंस्थेचे काम अधिकच वाढत जाते. शेवटी पोट साफ न होणे, उलटी होणं, खोकला, सर्दी, डोकेदुखी हे आजार आपली पचन संस्था नीट न राहिल्यामुळे उद्भवू शकतात. हे सगळं जर आपल्याला टाळायचं असेल तर त्याला उत्तम पर्याय म्हणजे उपवास.
आपल्या शरीरामध्ये सर्वाधिक ऊर्जा लागते ती म्हणजे पचनक्रियेसाठी. आपण साधा चिवड्याचा एक घास जरी खाल्ला तरी ते अन्न पचवण्यासाठी शरीरातील सगळी ऊर्जा पचन करण्यासाठी व्यस्त असते. मग जेव्हा आपण उपवास करतो तेव्हा शरीरातील ऊर्जेला इतर अवयवांकडे पाहण्यासाठी वेळ मिळतो आणि ही आपल्या शरीरातील ऊर्जा प्रत्येक अवयवाकडे जाऊन त्याचं कार्य व्यवस्थितपणे सुरू आहे का हे पाहते. ते कार्य विस्कळीत असेल तर त्या भागाला पूर्ववत करण्याचा प्रयत्न करते. मग रोजच्या दिवशी आपण सतत काही ना काही खात असल्यामुळे आपल्या बाकीच्या अवयवांकडे पाहण्यासाठी या ऊर्जेला वेळच मिळत नाही. आठवड्यातून किमान एक किंवा दोन दिवस तुम्ही तुमच्या पोटाला आराम देणे हा देखील एक शारीरिक शुद्धीक्रियेचा भाग आहे.
उपवास करण्याचे पण बरेचसे प्रकार आहेत सकाळचा उपवास, संध्याकाळचा उपवास, जल उपवास, फलाहार उपवास, दुधाचा उपवास, निराहार, दैनिक उपवास, साप्ताहिक उपवास. या प्रत्येक उपवासाचे आपल्या शरीरावर वेगवेगळे फायदे जाणवतात.
आता आपण या उपवासाचे फायदे जाणून घेऊया
उपवासामुळे शरीर डिटॉक्सिफाय होण्यास मदत मिळते :- आपण बऱ्याचदा बाहेर जेवल्यामुळे तेल आणि मसाल्याचे पदार्थ सेवन करतो. यामुळे शरीरातील टॉक्सिन्स बाहेर काढून टाकणं गरजेचं असतं, यामुळे फक्त पोटासंबंधी नाही तर त्वचेच्या समस्या पण टॉक्सिन्समुळे सुरू होतात. या टॉक्सिन्सला शरीरातून बाहेर काढून टाकायला हा उपवास खूप मदत करतो. यासाठी आपण फक्त पेय पदार्थ म्हणजे फळांचा रस, लस्सी, ताक, पन्ह, पाणी असे पदार्थ पिल्याने शरीर डिटॉक्सिफाय करू शकतो. यामुळे त्वचेसंबंधीच्या समस्या कमी होऊ लागतात. व्यवस्थितपणे उपवास केल्यामुळे वजन कमी करण्यासाठी ही याचा फायदा होतो, पचनक्रिया सुधारते, कोलेस्ट्रॉल कमी होते, त्वचा अधिक सुंदर होते, मानसिक आणि भावात्मक लाभ होतो, वय वाढते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली प्रतिकारशक्ती वाढते. कोणत्याही आजारापासून दूर राहण्यासाठी शरीरामध्ये प्रतिकार शक्ती असणं अत्यंत आवश्यक आहे उपवासाचा हा एक फायदा होतो. तो म्हणजे शरीरातील विषारी तत्व बाहेर फेकले जातात व आपली प्रतिकार शक्ती वाढते. उपवास करायचा म्हणजे दिवसभर केवळ पाण्यावर राहायचं आणि स्वतःला त्रास करून घ्यायचा असं अजिबात नाही. नियमित काही तासांनी फळ खाऊ शकता अथवा उसाचा रस ताक पाणी घेऊ शकता.
उपवासाच्या वेळी आपण काय खाऊ शकतो :- तुम्ही जर नव्याने उपवास सुरू करत असाल तर थोडसं खाऊन उपवास करू शकता जसं की गुळ शेंगदाण्याचा लाडू, राजगिऱ्याचा लाडू, उकडलेलं रताळ, पनीर, दही साखर, लस्सी, भाजणीची दशमी.
अति उपवास कोणी करू नयेत लहान मुलांनी, वृद्धांनी, गरोदर महिलांनी, व्याधीग्रस्त रुग्णांनी, ज्या व्यक्तींना पित्ताचा त्रास आहे, अति उच्च रक्तदाब असेल अशांनी उपवास करणे टाळावे.
डॉ. भाग्यश्री केंडे – वैद्य.
पुणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *