‘लोकसेवा जन स्पंदन’च्या सहसंपादकपदी विठ्ठलराव वाघमारे यांची निवड
पुणे प्रतिनिधी : लोकसेवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य या मान्यताप्राप्त संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा चेअरमन विठ्ठलराव वाघमारे यांची ‘साप्ताहिक लोकसेवा जन स्पंदन’च्या सहसंपादकपदी निवड करण्यात आली आहे.
लोकसेवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य ही संस्था नोंदणी क्रमांक ५११ अंतर्गत कार्यरत असून, सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात संस्थेचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. सामाजिक क्षेत्रातील दीर्घ अनुभव आणि जनसामान्यांशी असलेला सातत्यपूर्ण संपर्क लक्षात घेता विठ्ठलराव वाघमारे यांची सहसंपादकपदी झालेली निवड वृत्तपत्राच्या वाटचालीसाठी महत्त्वपूर्ण मानली जात आहे.
विठ्ठलराव वाघमारे यांच्या सहसंपादकपदी निवडीबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार आणि नागरिकांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
‘लोकसेवा जन स्पंदन’च्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न, सामाजिक व शैक्षणिक विषय, आरोग्यविषयक जनजागृती, ग्रामीण भागातील समस्या तसेच विविध सामाजिक उपक्रमांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. जनहिताला केंद्रस्थानी ठेवून वस्तुनिष्ठ आणि जबाबदार पत्रकारितेला प्राधान्य देण्यात येणार आहे.