कॉस्मेटिक क्षेत्रात डॉ. रावसाहेब वाघमारे यांचे महत्त्वपूर्ण यश

डॉ. रावसाहेब वाघमारे यांना कॉस्मेटिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण यश*

पुणे प्रतिनिधी — एक्यूप्रेशर, नॅचरोपॅथी आणि समग्र आरोग्य उपचार क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे तज्ज्ञ डॉ. रावसाहेब वाघमारे यांनी उच्चस्तरीय कॉस्मेटिक कोर्स यशस्वीरीत्या पूर्ण करून आपल्या व्यावसायिक कारकिर्दीत आणखी एक सुवर्णमय अध्याय जोडला आहे.

सौंदर्य, त्वचा आरोग्य, अँटी-एजिंग, स्किन केअर आणि नॉन-सर्जिकल कॉस्मेटिक थेरपी या क्षेत्रांत अत्याधुनिक ज्ञान प्राप्त केल्यामुळे डॉ. वाघमारे आता रुग्णांना सुरक्षित, वैज्ञानिक व नैसर्गिक उपचारांची जागतिक दर्जाची सेवा देऊ शकणार आहेत.

आरोग्यसेवेत सौंदर्य आणि आत्मविश्वास यांचे महत्त्व लक्षात घेऊन त्यांनी हा कोर्स पूर्ण केला असून, समग्र उपचार पद्धतीत कॉस्मेटिक थेरपीचा समावेश करून त्यांनी आरोग्यसेवेला एक नवे परिमाण दिले आहे.

त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल वैद्यकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, भविष्यात सौंदर्य आणि आरोग्य उपचार क्षेत्रात त्यांचे कार्य आदर्श ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *