स्त्रीशक्तीचा गौरव : डॉ. भाग्यश्री वैद्य यांना महिला रत्न पुरस्कार

स्त्रीशक्तीचा जागर : डॉ. भाग्यश्री वैद्य यांना महिला रत्न पुरस्कार

पुणे (प्रतिनिधी) – पुण्यातील पुरातन सोमवंशीया क्षत्रिय कालिका देवी संस्थान, पुणे तर्फे दरवर्षी साजरा होणाऱ्या नवरात्र उत्सवात यावर्षी समाजातील विविध क्षेत्रातील महिलांना महिला रत्न पुरस्कार देऊन सन्मानित केले गेले.

डिवाइन योगा अकॅडमीच्या संस्थापक व आरोग्य तज्ञ डॉ. भाग्यश्री वैद्य यांना हा गौरव प्राप्त झाला. सोहळ्यात इंडियन एअर फोर्स फ्लाईंग ऑफिसर कुमारी निसर्ग टेकवडे, वरिष्ठ पोलीस अधिकारी पी.एस.आय. गिरीशा निंबाळकर, डॉ. रोहिणी पवार, राष्ट्रीय खेळाडू कुमारी पूर्वी गांजवे आणि पत्रकार सौ. स्मृती कुलकर्णी यांचाही गौरव करण्यात आला.

कार्यक्रमात सर्व सन्मानित महिलांच्या हस्ते कालिका देवीची आरती झाली, त्यानंतर वाजत-गाजत व्यासपीठावर पुष्पवृष्टी, औक्षवंत व पारंपरिक सन्मान देऊन पुरस्कार प्रदान करण्यात आला.

डॉ. वैद्य म्हणाल्या, “हा सन्मान माझ्यासाठी गौरवाची बाब असून समाजासाठी आरोग्य व योग या माध्यमातून अधिक कार्य करण्याची प्रेरणा मिळाली आहे.”
या सुंदर अनुभवासाठी आणि पुरस्कारासाठी सर्व पुरस्कारीत्यांनी विशेष धन्यवाद दिले सोमवंशीय क्षत्रिय कालिका देवी संस्थान पुणे विश्वस्त आणि विशेष धन्यवाद सौ सुनीता व्यवहारे, सौ विद्या भंडारे, सौ स्मिता धारूरकर आणि या कार्यक्रमासाठी दिवस रात्र झटणारे सर्व कार्यकर्ते..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *