राष्ट्रीय प्राकृतिक चिकित्सा संस्थान, बापू भवन येथे गेल्या अनेक वर्षांपासून डायबिटीस जनजागृती उपक्रम राबवला जात आहे

राष्ट्रीय प्राकृतिक चिकित्सा संस्थान, बापू भवन येथे डायबिटीस जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार

लोकसेवा न्यूज प्रतिनिधी पुणे :
आज राष्ट्रीय प्राकृतिक चिकित्सा संस्थान, बापू भवन येथे डायबिटीस जनजागृती व मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या कार्यक्रमात तज्ञ डॉक्टर आणि आरोग्यतज्ज्ञांनी डायबिटीसचे प्रकार, लक्षणे, तसेच आयुर्वेद, निसर्गोपचार आणि योगाच्या माध्यमातून होणारे परिणामकारक उपाय याबद्दल सविस्तर माहिती दिली.

कार्यक्रमात उपस्थित नागरिकांना योग्य आहारपद्धती, नियमित व्यायाम, ध्यान, आणि अक्युप्रेशर उपचारांच्या मदतीने रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवण्याचे महत्त्व सांगण्यात आले.

या प्रसंगी वक्त्यांनी सांगितले की — “संतुलित जीवनशैली आणि नैसर्गिक उपचारपद्धती हेच डायबिटीस नियंत्रणाचे प्रभावी साधन आहे.”
कार्यक्रमात नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला, तसेच शेवटी प्रश्नोत्तर सत्र आयोजित करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *