नागरिकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी‘लोकसेवा जन स्पंदन’ सज्ज

नागरिकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी ‘लोकसेवा जन स्पंदन’ सज्ज

जनहिताच्या मुद्द्यांना प्राधान्य देत वस्तुनिष्ठ आणि निर्भीड पत्रकारितेचा संकल्प

सोलापूर, अक्कलकोट प्रतिनिधी : सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या, स्थानिक प्रश्न तसेच समाजातील विविध क्षेत्रांतील सकारात्मक घडामोडींना प्रभावी व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने साप्ताहिक लोकसेवा जन स्पंदनची पत्रकारितेच्या क्षेत्रात वाटचाल सुरू झाली आहे.

ग्रामीण भागापासून शहरापर्यंत नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित प्रश्नांना प्राधान्य देत शिक्षण, आरोग्य, रोजगार, शेती, प्रशासन, सामाजिक उपक्रम आणि जनहिताच्या विविध विषयांचे वार्तांकन करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील प्रश्न संबंधित प्रशासन आणि यंत्रणांपर्यंत पोहोचविण्याचे प्रभावी साधन आहे. त्यामुळे सत्यता, वस्तुनिष्ठता आणि जनहित या तत्त्वांना केंद्रस्थानी ठेवून ‘लोकसेवा जन स्पंदन’ची वाटचाल राहणार आहे.

नागरिकांच्या समस्या, सूचना आणि अपेक्षांना योग्य व्यासपीठ मिळावे, तसेच समाजासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांच्या कार्याची दखल घेतली जावी, यासाठी वाचकांचा सहभाग महत्त्वाचा ठरणार आहे.

साप्ताहिक लोकसेवा जन स्पंदन हे जनतेशी जोडलेले विश्वासाचे व्यासपीठ निर्माण करण्यासाठी कटिबद्ध आहे.

कार्यकारी संपादक : डॉ. रावसाहेब वाघमारे

आपल्या परिसरातील समस्या, घटना आणि सकारात्मक उपक्रमांची माहिती आम्हाला पाठवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *