बोरगाव देशमुख येथे पल्स पोलिओ मोहिमेअंतर्गत अथर्व वाघमारे याला पहिला डोस

अथर्व वाघमारे याला पोलिओचा पहिला डोस

बोरगाव देशमुख (ता. अक्कलकोट): राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत बोरगाव देशमुख येथे लहान बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे डोस देण्यात आले. यावेळी चिमुकला अथर्व वाघमारे याला आरोग्य सेविका कल्पना घोडके यांच्या हस्ते पोलिओचा पहिला डोस देण्यात आला.

या प्रसंगी लोकसेवा प्रतिष्ठान महाराष्ट्राचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठलराव वाघमारे, ग्रामपंचायत सदस्य बाळकृष्ण बनसोडे, पोस्टमास्तर प्रकाश भोंडवे तसेच डॉ. घंटे उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी पालकांना आपल्या बालकांना वेळेवर पोलिओचे डोस देण्याचे आवाहन केले.

दोन थेंब प्रत्येक वेळी, पोलिओमुक्त निरोगी भविष्यासाठी” हा संदेश देत गावातील सर्व पालकांनी आपल्या मुलांना पोलिओ लसीकरणासाठी पुढे यावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. गावातील नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत करून आरोग्य विभागाच्या कार्याचे कौतुक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *