बोरगाव देशमुख स्टॅण्ड ते वागदरी रस्त्याची दुरवस्था; नागरिकांची संतप्त प्रतिक्रिया
अक्कलकोट | प्रतिनिधी :
अक्कलकोट तालुक्यातील बोरगाव देशमुख येथील स्टॅण्ड ते वागदरी या मार्गाची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून पावसाळ्यात परिस्थिती अधिकच बिकट बनते.
दररोज या मार्गावरून शाळकरी विद्यार्थी, शेतकरी तसेच ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणावर ये-जा सुरू असते. मात्र खराब रस्त्यामुळे अपघातांची शक्यता वाढली असून वाहनधारकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
स्थानिक ग्रामस्थांनी प्रशासनाकडे अनेक वेळा दुरुस्तीची मागणी करूनही अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
संबंधित विभागाने तात्काळ दखल घेऊन बोरगाव देशमुख स्टॅण्ड ते वागदरी या रस्त्याची दुरुस्ती करून नवीन रस्ता तयार करावा, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

– बाबासाहेब वाघमारे, प्रतिनिधी
लोकसेवा न्यूज
