“सोलापूर ग्रामीण पोलीसांचे तक्रार निवारण दिन संपन्न”**

एसपी अतुल कुलकर्णी यांचा जनता दरबार – नागरिकांच्या तक्रारींचे समाधान

सोलापूर: सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या वतीने सामान्य नागरिकांच्या तक्रारींचे त्वरित निराकरण करण्यासाठी भव्य जनता दरबार व तक्रार निवारण दिन आयोजित करण्यात आले.

पोलीस अधीक्षक श्री. अतुल वि. कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर ग्रामीण घटकातील नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी अलंकार हॉल, पोलीस मुख्यालय येथे हा दरबार पार पडला. सकाळी १०.०० ते संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत नागरिकांनी आपले प्रश्न आणि तक्रारी पोलीस अधिकाऱ्यांसमोर मांडल्या.

पोलीस अधीक्षक यांनी उपस्थित नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेतल्या आणि त्वरित निराकरणासाठी संबंधित पोलीस ठाण्यांचे अधिकारी व अंमलदार तातडीने उपस्थित होते. या उपक्रमात श्री. राहुल आत्राम, भापोसे परिविक्षाधीन पोलीस अधीक्षक, तसेच श्री. संकेत देवळेकर, एस.डी.पी.ओ., सोलापूर उपविभाग हजर होते.

महिला शाखा आणि भरोसा सेल महिला संबंधित तक्रारींचे निराकरण करत होते. या दरम्यान एक वर्षापासून विभक्त असलेल्या महिलेला तिच्या माहेरच्या कुटुंबासोबत हजर असताना सासरकडे योग्य मार्गदर्शन देऊन पुनः सासरी पाठविण्यात आले.

एकूण ७८ नागरिकांनी आपल्या तक्रारी मांडल्या, त्यापैकी १४३ तक्रारी अर्जावर कारवाई करून निराकरण करण्यात आले. ज्यांच्या तक्रारींवर पुढील दखल घेणे आवश्यक आहे, त्या तक्रारी संबंधित पोलीस ठाण्यांकडे वर्ग करण्यात आल्या.

विधी सेवा मार्गदर्शनासाठी अॅड. श्री. शिवकैलास झुरळे, उपमुख्य लोकअभिरक्षक, विधीसेवा प्राधिकरण, सोलापूर यांना उपस्थित ठेवण्यात आले होते.

जनता दरबार सफल करण्यासाठी पोलीस कर्मचारी श्री. उस्मान शेख, सचिन चव्हाण, ज्योती कोरे, पूजा करडे, गंवडी, कुर्ले, विश्वकर्मा व महिला शाखेतील सुरेखा शिंदे, ए.एस.आय. कवचाळे, भोगे, चव्हाण, मस्के, शिंदे, पवार हजर होते आणि त्यांनी नागरिकांच्या तक्रारी ऐकून योग्य ती कारवाई सुनिश्चित केली.

सदर उपक्रमामुळे नागरिकांना त्वरित न्याय व समाधान मिळाले असून, सहभागी महिलांनी पोलीस दलाचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *