बोरगाव देशमुख — भीम नगर येथील मिनी अंगणवाडी शाळेत 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात संविधानाच्या प्रास्ताविकेच्या सामूहिक वाचनाने झाली. उपस्थित नागरिकांनी संविधान मूल्यांच्या दृढ पालनाची शपथ घेतली.
कार्यक्रमास माझी ग्रामपंचायत सदस्य रोहिदास गायकवाड, बाळू गायकवाड, बाबासाहेब वाघमारे, लोकसेवा न्यूज प्रतिनिधी विठ्ठलराव वाघमारे, शिंदे मॅडम, गावडे मॅडम, लोकसेवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याच्या खजिनदार शितल वाघमारे, तसेच मनीषा रणझुंजारे आणि यल्लावा वाघमारे यांची उपस्थिती लाभली.
संविधान दिनानिमित्त गावातील नागरिक, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. उपस्थितांच्या सहभागामुळे संविधान मूल्यांची जागरूकता आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश प्रभावीपणे पोहोचला.

अक्कलकोट प्रतिनिधी : विठ्ठलराव वाघमारे
