रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) तर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर शाळा प्रवेश दिन — विद्यार्थी दिन उत्साहात साजरा
सोलापूर, दि. ७ नोव्हेंबर:
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या वतीने आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर शाळा प्रवेश दिन — विद्यार्थी दिन मोठ्या उत्साहाने आणि अभिमानाने साजरा करण्यात आला.
या प्रसंगी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा. राजाभाऊ सरवदे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यकर्त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
आजचा दिवस म्हणजे परमपूज्य बोधिसत्व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाच्या प्रवासाची पहिली पायरी ठेवलेला ऐतिहासिक दिवस आहे. सन २०१७ मध्ये महाराष्ट्र शासनाने डॉ. आंबेडकर यांच्या शाळा प्रवेश दिनाला “विद्यार्थी दिन” म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. त्या आदेशानुसार राज्यातील सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये हा दिवस साजरा केला जातो.
तथापि, काही ठिकाणी अजूनही या शासन आदेशाची अंमलबजावणी होत नसल्याने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी व जिल्हा शिक्षण अधिकारी यांच्याकडे या दिवसाचे सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये पालन व्हावे याबाबत मागणी करण्यात येणार आहे.
या निमित्ताने पक्ष प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांनी सांगितले की,
“बाबासाहेबांच्या शिक्षणतत्त्वज्ञानातून आपण प्रत्येक घटकाला शिक्षणाद्वारे समानता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय या मूल्यांशी जोडले पाहिजे. आपल्या कुटुंबातील एकही व्यक्ती निरक्षर राहू नये — हेच बाबासाहेबांच्या कार्याला खरे अभिवादन ठरेल.”
डॉ. आंबेडकर यांनी शाळेतील पहिल्या दिवशी ठेवलेले पाऊल हे केवळ एका विद्यार्थ्याचे नव्हते, तर ज्ञान, आत्मसन्मान आणि मानवमुक्तीच्या क्रांतीचे पहिले पाऊल होते.
या प्रसंगी के. डी. कांबळे, अतुल नागटिळक, पवन थोरात, सुशील सरवदे, दत्ता कांबळे, सुग्रीव जेटीथोर, शिवराज पुल्लूर, किशोर इंगळे, मलिक राजगुरू, शिवम सोनकांबळे, जानाप्पा कांबळे, सचिन शिंदे, उमेश उबाळे, राहुल वाळके, शीतल कांबळे, सचिन ढेपे, किरण बनसोडे, चिया कांबळे, नागेश भंडारे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
