सर्वधर्मसमभाव आणि बंधुतेचा दीपोत्सव साजरा करा — केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

लोकसेवा न्यूज विशेष रिपोर्ट
मुंबई | दि. 22 ऑक्टोबर 2025

सर्वधर्मसमभाव आणि बंधुतेचा दीपोत्सव साजरा करा — केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

दीपावली हा अंध:कारावर मात करून प्रकाश, आनंद आणि बंधुभावाचा संदेश देणारा उत्सव आहे. सर्व धर्म, जाती, पंथ यांना जोडणारा आणि संविधानाने दिलेल्या सर्वधर्मसमभावाच्या मूल्यांना दृढ करणारा हा सण आहे, असे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ना. रामदास आठवले यांनी म्हटले आहे.

आठवले म्हणाले की, “दीपोत्सव म्हणजे अंध:कारावर मात करणारा प्रकाशाचा उत्सव. या उत्सवाच्या निमित्ताने समाजात एकोपा, बंधुता आणि सौहार्द यांचा उजेड पसरला पाहिजे. सर्व जाती-धर्मातील लोकांनी मिळून साजरा केलेली ही दीपावली बंधुभाव आणि मानवतेचा खरा संदेश देणारी ठरावी.”

ते पुढे म्हणाले, “आपण सर्वांनी स्वदेशी वस्तूंच्या खरेदीचा निर्धार केला पाहिजे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रदूषण करणारे फटाके टाळून पर्यावरणपूरक दीपावली साजरी करावी. सर्वांनी एकमेकांना शुभेच्छा देऊन प्रेम, एकता आणि सर्वधर्मसमभावाचा दीप लावावा.”

शेवटी मंत्री आठवले म्हणाले की, “ही दीपावली सर्वांना सुख, समाधान आणि आरोग्य देणारी ठरो. देशात प्रेम, बंधुता आणि शांतीचा संदेश देणारा उत्सव ठरावा, हीच प्रार्थना.”


लोकसेवा न्यूज
“समाजासाठी – सत्य, समता आणि सेवेसाठी”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *