अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारचा मोठा दिलासा – २,२१५ कोटींच्या मदतीची घोषणा

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारचा मोठा दिलासा – २,२१५ कोटींच्या मदतीची घोषणा

🖊️ लोकसेवा न्यूज प्रतिनिधी

मुंबई :
राज्यातील अतिवृष्टीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना महायुती सरकारने मोठा दिलासा दिला आहे. मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने तब्बल ३१ लाख ६४ हजार शेतकऱ्यांना एकूण २,२१५ कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे.

या निर्णयामुळे शेतकरी वर्गाला दिलासा मिळणार असून, नव्या आत्मविश्वासाने शेतकरी पुढील हंगामासाठी उभारी घेऊ शकतील, असा विश्वास सरकारने व्यक्त केला आहे. संकटाच्या काळात शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची परंपरा महायुती सरकारने या निर्णयातून कायम ठेवली आहे.

या संवेदनशील निर्णयाबद्दल शेतकरी व विविध कृषी संघटनांकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्यासह महायुती सरकारचे मनःपूर्वक आभार मानले जात आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *