परंड्यातील जीव वाचवणारी थरारक मोहीम – खासदार ओमराजे निंबाळकर स्वतः बचावकार्यात सहभागी!

परंड्यातील जीव वाचवणारी थरारक मोहीम – खासदार ओमराजे निंबाळकर स्वतः बचावकार्यात सहभागी!

🖊️ लोकसेवा न्यूज प्रतिनिधी

वडनेर (ता. परंडा): परंडा तालुक्यातील वडनेर गावात अतिवृष्टीमुळे आलेल्या पुराच्या पाण्यात एकाच कुटुंबातील आजी, दोन वर्षांचा मुलगा आणि दोन व्यक्ती काल रात्री २ वाजल्यापासून मृत्यूच्या दाढेत अडकले होते. अन्न-पाणी नसताना ते घराच्या छपरावर बसून मदतीची वाट पाहत होते.

आज सायंकाळी ८ वाजता खासदार ओमराजे निंबाळकर स्वतः NDRF च्या जवानांसोबत बचावकार्यात सहभागी झाले आणि हे संपूर्ण कुटुंब सुखरूप बाहेर काढले.

गावकऱ्यांच्या आणि NDRF च्या जवानांच्या अथक प्रयत्नांमुळे हे बचावकार्य यशस्वी झाले.

💐 मनःपूर्वक आभार व अभिनंदन – खासदार ओमराजे निंबाळकर, NDRF टीम आणि गावकरी यांच्या धाडसी प्रयत्नांमुळे मृत्यूच्या छायेत अडकलेले हे कुटुंब वाचवले गेले.

#परंडा #अतिवृष्टी #NDRF #RescueOperation #ओमराजेनिंबाळकर #लोकसेवा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *