रिपब्लिकन पक्षाच्या मुंबई प्रदेशची उद्या गोराई,बोरीवलीत महत्वपूर्ण बैठक : केंद्रीयराज्यमंत्री रामदास आठवले उपस्थीत राहणार

रिपब्लिकन पक्षाच्या मुंबई प्रदेशची उद्या गोराई,बोरीवलीत महत्वपूर्ण बैठक : केंद्रीयराज्यमंत्री रामदास आठवले उपस्थीत राहणार

मुंबई दि.2- रिपब्लिकन पक्षाच्या मुंबई प्रदेशची महत्वपुर्ण बैठक उद्या शुक्रवार दि.3 जानेवारी 2025 रोजी सायंकाळी 6 वाजता क्रांतीज्योत सावित्रीमाई फुले यांच्या 194 व्या जयंती दिनी बोरीवली पश्चिम गोराई येथील हॉटेल बेव्हयु च्या सभागृहात आयोजित करण्यात आली आहे.यावेळी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रिय सामाजिक राज्यमंत्री ना.रामदास आठवले प्रमुख मार्गदर्शक म्हणुन उपस्थित राहणार आहेत.यावेळी मुंबई प्रदेश मधील सर्व वॉर्ड,तालुका आणि जिल्हाअध्यक्षांनी तसेच विविध आघाडीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे मुंबई प्रदेश अध्यक्ष सिध्दार्थ कासारे यांनी केले आहे.

       रिपब्लिकन पक्षाच्या मुंबई प्रदेशच्या या महत्वपुर्ण बैठकीत मुंबईत राहणाऱ्या राष्ट्रीय कमीटी आणि राज्य कमीटीच्या पदाधिकाऱ्यांनी वेळेवर उपस्थित रहावे असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे मुंबई प्रदेश अध्यक्ष सिध्दार्थ कासारे ;कार्याध्यक्ष बाळासाहेब गरुड,सरचिटणीस विवेक पवार,खजिनदार सुनिल मोरे  यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *