मुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्याशी आज मुंबई येथे पुण्याच्या विविध विकासकामांसंदर्भात चर्चा झाली.
मा. देवेंद्रजींसमवेत चर्चा झालेले मुद्दे…
पुणे प्रतिनिधी: रावसाहेब वाघमारे
पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळासाठीच्या धावपट्टीच्या विस्तारणीकरणासाठी भूसंपादन प्रक्रियेला गती देण्यासंदर्भात चर्चा
- पुरंदर येथील प्रस्तावित विमानतळाला गती देण्यासाठी बैठकीचे लवकरच आयोजन
- राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये विमानतळ साकारणे, अस्तित्वातील विमानतळांच्या धावपट्टींचा विस्तार करणे, नाईट लॅडिंगची सुविधा उपलब्ध करणे, उडान योजनेच्या माध्यमातून राज्यांतर्गत अधिक विमानसेवा उपलब्ध करून देणे , राज्यातील विमानतळांच्या पायाभूत सुविधांवर काम करणे यासंदर्भात नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक
- केंद्र सरकारकडून पुणे शहराला एक हजार नव्या ई-बसेस मिळण्यासाठी राज्य सरकारकडून केंद्राला प्रस्ताव पाठवण्यासंदर्भात चर्चा
- पुणे आणि खडकी या दोन कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या पुणे महापालिकेतील विलीनीकरण प्रक्रियेला गती मिळावी
- पुणे-लोणावळा रेल्वे मार्गावर तिसऱ्या व चौथ्या मार्गिकेसंदर्भातील प्रक्रियेला वेग
- पुणे शहराची भविष्याची गरज लक्षात घेत पुणे शहराला मुळशी धरणातून पाणी पुरवठा करण्याचे नियोजन
- पुणे महापालिकेला रिक्त जागांवर दोन अतिरिक्त आयुक्त लवकरात लवकर मिळावे..
