पुणे:आज 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिन तुम्हाला माहीतच असेल 21 जून हा दिवस वर्षातील सर्वात मोठा दिवस असल्यामुळे या दिवशी आपण योगा दिन म्हणून साजरा करतो. अजून सांगायचे म्हटले तर योगा करणे शरीरासाठी किती आवश्यक आहे याचा आरोग्याला काय फायदा होऊ शकतो या सगळ्याची जागरूकता निर्माण करण्यासाठी 21 जूनला आंतरराष्ट्रीय योगा दिन साजरा केला जातो. योग आपल्या रोजच्या दिनचर्येच्l फार महत्त्वाचा भाग आहे. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये योगाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे.
दरवर्षी योगा दिनाची वेगवेगळी संकल्पना असते मग यावर्षीची संकल्पना आहे मानवता (हुमानिटी) मग तुम्हाला वाटेल मानवता आणि योगा चा आणि याचा काय संबंध? योगा म्हणजे फक्त शारीरिक हालचाली नसून आपलं मन प्रसन्न, शांत व संयमी बनवण्यासाठी याचा खूप मोठा वाटा आहे. आपल् शरीर व मन नाण्याच्या सो दोन बाजू आहेत. योगा करताना आपल्या शरीराची हालचाल होते आणि आपली ऊर्जा वाढते तेव्हा आपलं मन शांत व स्थिर होऊ लागतं. मन शांत झालं की आपल्यामधील मानवता कायम जागृत राहते.
सध्याच्या धकाधकीच्या जीवनात आपली जीवनशैली बदललेली आहे स्मार्टफोन आणि डिजिटल दुनियेमध्ये वेळही खूप तोडका झालेला आहे खाण्यापिण्यातील बदल पुरे शारीरिक कष्ट आणि व्यायामाची कमतरता यामुळे खूप सार्या व्याधींना सामोरे जावे लागत आहे आज-काल जवळपास 90% महिला कोणत्या ना कोणत्या आजाराने जखडलेल्या आहेत बऱ्याच जणांना योगा करण्याची इच्छा असते मात्र वेळेअभावी ते करू शकत नाहीत त्यांनी 12 सूर्यनमस्कार आणि प्राणायाम एवढं तरी करावं.
जगणे ही एक कला आहे. योगामुळे जीवनाचा दर्जा उंचावतो म्हणून, योग विद्या ही सुद्धा एक कला आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही कारण योगाच्या अध्ययनाने मनुष्याचे विचार उच्च बनतात व त्याला आयुष्यातील चढउतारांना अति त्रास न होता हिमतीने सामोरी जाण्याचे सामर्थ्य मिळते. संतोष, ध्येयवाद, मैत्री, भक्ती, एकाग्रता, समाधान, भौतिक सुखाचा त्याग अशा गुणांचे संवर्धन होते आणि मनुष्य सद्गुनी आणि सदाचारी बनतो.
योगासनांचा अभ्यास केल्याने आपल्यामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. योग तुम्हाला वर्तमानात जगायला शिकवतो. योगामुळे आपले स्नायू बळकट बनतात, आपली पचनशक्ती सुधारते, पोट साफ व निरोगी राहते. त्यामुळे प्रतिकारशक्ती वाढते. वजन कमी किंवा जास्त होतं. पाठीचा कणा मजबूत राहतो मन शांत व स्थिर राहते.
योग हा एक उत्तम उपक्रम आहे जो तणाव दूर करण्यासाठी आणि शांतता प्राप्त करण्यासाठी विविध मुद्रा, ध्यान, जप व मंत्र एकत्र करतो. वयाची कोणतीही मर्यादा न ठेवता हे सगळ्यांना शिकवता येते. हा एक खरोखरच अध्यात्मिक व्यायाम आहे जो आरोग्य, मन व आत्म्याशी संबंधित फायदा देतो.
शेवटी इतकच म्हणेल की निरोगी आणि सुसंवादी जीवन जगण्यासाठी योग अभ्यास करणे गरजेचे आहे. तेव्हा हा योग फक्त योग दिनापुरता न ठेवता आपल्या जीवनशैलीचा एक भाग बनवावा.
डॉ. भाग्यश्री वैद्य
पुणे
