सोलापूर,25मे(लोकसेवा न्यूज)
सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय नूतन इमारतीचा उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले
यावेळी .महसूल पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना. राधाकृष्ण विखे पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
यावेळी नूतन इमारतीच्या मध्यभागी उभारण्यात आलेल्या संविधान कोनशिलेचे अनावरण उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमास खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी, रणजीत सिंह नाईक निंबाळकर, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सुभाष बापू देशमुख, आमदार सचिन दादा कल्याण शेट्टी,आमदार रणजीत सिंह मोहिते पाटील, राजेंद्र राऊत, आमदार समाधान आवताडे, आमदार शहाजी बापू पाटील, आमदार बबनदादा शिंदे, आमदार राम सातपुते, उपस्थित होते.
यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नवीन इमारतीसाठी जिल्हा प्रशासनास शुभेच्छा देऊन अभिनंदन केले.
