अक्कलकोट ते सलगर बस सेवा फेरी वाढवा. सुनील पुटगे अक्कलकोट दि. २२ अक्कलकोट ते सलगर या मार्गावर दर अर्धातासाला बस सेवा सुरू करा असे शिवसेना प्रणीत वाहतूक सेना तालुकाप्रमुख सुनील पुटगे यानी सोमवारी वाहतूक नियंत्रक अक्कलकोट याना निवेदन देऊन अक्कलकोट ते सलगर वाहतूक सुरळीत करावी असे म्हणाले अक्कलकोट ते सलगर या मार्गावर पूर्वी दर अर्धा तासाने बससेवा सुरू होती. परंतु कोरोना महामारीच्या कालावधीपासून बससेवा विस्कळीत झालेली आहे.
सलगर ते अक्कलकोट या मार्गावरून एस. टी. बसने दररोज शेकडो प्रवासी प्रवास करतात. सध्या सणासुदीचा कालावधी, उन्हाळी सुट्ट्या, लग्न सराई यामुळे नागरीकांच्या प्रवासात सातत्याने वाढ होत आहे. सलगर गावची यात्रा जवळ आलेली आहे.
तरी या सर्व बाबींचा प्रथम प्रधान्याने विचार करून सलगर ते अक्कलकोट या मार्गावरील बससेवा दर अर्धा तासाने सुरळीत करावी, असे पुटगे म्हणाले लवकरच तालुकाप्रमुख संजय देशमुख यांची भेट घेऊन तालुक्यातील सर्व गावाना वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक सेनेची बैठक घेणार आहे असे पुटगे म्हणाले या वेळी शहरप्रमुख योगेश पवार व इतर कार्यकर्ते उपस्थित होते

