योग – आधुनिक जीवनातील आरोग्य आणि शांतीचा आधारस्तंभ
सोलापूर, दि. 22 ऑक्टोबर (प्रतिनिधी : विठ्ठलराव वाघमारे)
आजच्या तणावग्रस्त आणि धावपळीच्या जीवनशैलीत “योग” हे केवळ व्यायामाचे माध्यम राहिलेले नाही, तर संपूर्ण जीवनशैलीचा आधार बनले आहे. नियमित योगाभ्यासामुळे शरीराचे संतुलन, मनाची शांती आणि आत्मिक स्थैर्य साध्य होते, असे आरोग्यतज्ज्ञांचे मत आहे.
योगाचार्य डॉ. रावसाहेब वाघमारे यांनी सांगितले की, “योग ही भारतीय संस्कृतीची प्राचीन देणगी असून ती फक्त आसनांपुरती मर्यादित नाही. प्राणायाम, ध्यान आणि सात्त्विक आहार या घटकांमुळे योगाचे खरे सार प्रकट होते. आजच्या काळात योग प्रत्येक घरात पोहोचणे अत्यंत गरजेचे आहे.”
Holistic health studio तर्फे पुणे व मुंबई येथे “योगासाठी आधुनिक जीवनशैली” हा विशेष उपक्रम राबविण्यात येणार आहे. या कार्यक्रमांतर्गत नागरिकांना योगाच्या माध्यमातून नैसर्गिक आरोग्य, मानसिक स्थैर्य आणि सकारात्मक जीवनशैलीचा संदेश दिला जाणार आहे.