लोकसेवा न्यूज

ग्रामस्थांच्या एकमताने चन्नाप्पा मामा कामशेट्टी यांची तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड

ग्रामस्थांच्या एकमताने तंटामुक्त समितीची बिनविरोध निवड; चन्नाप्पा मामा कामशेट्टी अध्यक्षपदी*

बोरगाव (ता. अक्कलकोट) : गावातील शांतता, सलोखा आणि सामाजिक ऐक्य कायम राखण्याच्या दृष्टीने तंटामुक्त समितीची निवड ग्रामस्थांच्या एकमताने व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. यामध्ये चन्नाप्पा मामा कामशेट्टी यांची अध्यक्षपदी तर हसन गादेखा पठाण यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. तसेच 21 सदस्यांचीही ग्रामस्थांच्या सर्वानुमते निवड करण्यात आली.

नवनिर्वाचित अध्यक्ष चन्नाप्पा मामा कामशेट्टी यांनी यापूर्वी पाच वर्षे सरपंच म्हणून यशस्वीपणे कार्यभार सांभाळत गावाच्या विकासासाठी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यांच्या कार्यकाळात विविध विकासकामे राबविण्यात आली असून गावाच्या प्रगतीमध्ये त्यांचे मोलाचे योगदान राहिले आहे. त्यांच्या नेतृत्वगुणांमुळे आणि लोकसंपर्कामुळे ग्रामस्थांनी त्यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास व्यक्त करत तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदाची धुरा सोपविली आहे.

यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून समितीच्या भावी कार्यास शुभेच्छा दिल्या. गावातील सामाजिक सौहार्द अधिक दृढ करण्यासाठी आणि विविध तंटे सामंजस्याने सोडविण्यासाठी समिती प्रभावीपणे कार्य करेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

– लोकसेवा न्यूज
प्रतिनिधी : विठ्ठलराव वाघमारे

Exit mobile version