आज प्रिया पाटील यांची अमरावती आकाशवाणीवर मुलाखत
गर्भसंस्काराचे महत्त्व या विषयावर महिलांना विशेष मार्गदर्शन
गर्भसंस्काराचे महत्त्व या विषयावर महिलांना विशेष मार्गदर्शन
अंजनगाव सुर्जी – (ता. प्र.)
येथील योग आणि निसर्गोपचार तज्ञ प्रिया नंदकिशोर पाटील यांची आज अमरावती आकाशवाणीला गर्भसंस्काराचे महत्त्व या विषयावर मुलाखत प्रसारीत होणार आहे. यावेळी कार्यक्रमाचे सादरकर्ते विनोद गवळी यांच्या मार्गदर्शनात शामली देशमुख यांनी घेतलेली ही मुलाखत आज बुधवार ५ मार्च रोजी सकाळीं १० वाजता श्रोत्यांना ऐकता येईल.
अंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून महिलांच्या उत्थानासाठी ही मुलाखत घेण्यात आली. यावेळी गर्भवती महिलांच्या विविध समस्यांवर प्रकाश टाकण्यात येणार आहे. तसेच गर्भसंस्काराची सुरुवात केव्हा सुरू करावी हे माहिती नसल्याने होणाऱ्या बाळावर दुष्परिणाम होतात. मेळघाटमध्ये महिलांना गर्भसंस्काराचे वर्ग दिल्यास कुपोषणाची समस्या कमी होऊ शकते.
प्रिया पाटील अंजनगाव सुर्जी मधील मानवसेवा पॅरामेडिकल कॉलेज मध्ये आहेत. तसेच त्यांनी योग आणि निसर्गोपचाराचे विविध अभ्यासक्रम व गर्भसंस्काराचे अभ्यासक्रम पूर्ण केलेले आहेत. या आधुनिक काळात महिला निसर्गाच्या दुर जात असल्याने भरपुर समस्या येत आहेत. म्हणून जास्तीत जास्त महिलांनी हि मुलाखत ऐकावी.