महाबोधी महाविहार मुक्तीसाठी सर्वपक्षीय बौद्ध नेत्यांची एकजूट*
“बिहारमध्ये कोणत्याही पक्षाचे सरकार असो, महाबोधी महाविहार प्रश्नावर बौद्धांना न्याय मिळालाच पाहिजे” — केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले
आझाद मैदानावर रखरखत्या उन्हात बौद्ध जनतेचे विराट शक्तिप्रदर्शन
मुंबई, 14 ऑक्टोबर:
“केल्याशिवाय ऐक्याचा प्रहार, मुक्त होणार नाही महाबोधी महाविहार” — या काव्यमय उद्घोषाने सुरू झालेल्या विराट मोर्चातून आंबेडकरी बौद्ध समाजाने एकजुटीचा आवाज बुलंद केला.
धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त, बुद्धगया येथील महाबोधी महाविहार मुक्त करून बौद्धांच्या ताब्यात द्यावा या मागणीसाठी महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन कृती समितीच्या वतीने मेट्रो सिनेमा ते आझाद मैदान असा भव्य मोर्चा काढण्यात आला.
या मोर्चाचे नेतृत्व रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी केले.
ना. रामदास आठवले यांचे प्रतिपादन
“मी मंत्री असलो तरी आंबेडकरी कार्यकर्ता आहे. नामांतरासाठी जसे मोर्चे काढले तसेच आता महाबोधी महाविहार मुक्तीसाठी मोर्चा काढला आहे. बिहारमध्ये कोणत्याही पक्षाचे सरकार असो, या प्रश्नावर बौद्धांना न्याय मिळालाच पाहिजे. बी.टी. ॲक्ट रद्द करून महाबोधी महाविहारचे व्यवस्थापन बौद्धांच्या हाती द्यावेच लागेल,”
— असे प्रतिपादन ना. रामदास आठवले यांनी केले.
ते पुढे म्हणाले,
“प्रा. जोगेंद्र कवाडे यांना आणि मला वाटते की रिपब्लिकन ऐक्य व्हावे. काहींना ऐक्य नको आहे, पण समाजाच्या एकजुटीशिवाय मुक्ती शक्य नाही. प्रकाश आंबेडकर यांनीही समाजाच्या एकजुटीसाठी प्रयत्न करायला हवेत.”
राजकारणाच्या पलीकडे सर्वपक्षीय बौद्ध नेत्यांची एकजूट
या विराट मोर्चात सर्व रिपब्लिकन गट, सर्व बौद्ध संघटना आणि विविध पक्षांचे बौद्ध नेते राजकारणाच्या पलीकडे जाऊन एकत्र आले होते.
राज्यभरातून आलेल्या हजारो बौद्ध अनुयायांनी रखरखत्या उन्हात प्रचंड उत्साहाने सहभाग घेतला.
उपस्थित भिक्खू संघ आणि मान्यवर
कार्यक्रमास पूज्य भदंत डॉ. राहुल बोधी महाथेरो, भंते विनाचार्य, भदंत हर्षवोधी, आकाश लामा यांसह अनेक भिक्खू संघ उपस्थित होते.
महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन कृती समितीचे निमंत्रक:
ना. रामदास आठवले, प्रा. जोगेंद्र कवाडे, डॉ. राजेंद्र गवई, नानासाहेब इंदिसे, सुरेश माने, सौ. सीमाताई आठवले, सुलेखाताई कुंभारे, खासदार वर्षाताई गायकवाड, खासदार चंद्रकांत हंडोरे, आमदार राजकुमार बडोले, आमदार संजय बनसोडे, आमदार बालाजी किणीकर, आमदार संतोष बांगार, अर्जुन डांगळे आदी नेते उपस्थित होते.
सभेचे सूत्रसंचालन गौतम सोनवणे यांनी केले.
प्रमुख सहभागी कार्यकर्ते
अविनाश महातेकर, देशक खोब्रागडे, चंद्रबोधी पाटील, काकासाहेब खांबलकर, जीत आठवले, जयदीप कवाडे, पप्पू कागदे, आनंद शिंदे, राजू वाघमारे, तानसेन ननावरे, राजा सरवदे, बाबुराव कदम, सागर संसारे, सुनील निर्भवने, अविनाश कांबळे, कुणाल कांबळे, बुद्धभूषण गोटे, सुरेश सावंत, घनश्याम चिरणकर, विलास रूपवते, रवी गरुड, मिलिंद सुर्वे, श्रीकांत भालेराव, दयाळ बहादुर, सिद्धार्थ कासारे, विवेक पवार, चंद्रशेखर कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.