लोकसेवा न्यूज

अक्कलकोट तालुक्यात महापूराचा कहर; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

## अक्कलकोट तालुक्यात महापूराचा कहर; गावोगावी प्रचंड नुकसान **अक्कलकोट प्रतिनिधी | लोकसेवा न्यूज**भीमा व सीना नदीला आलेल्या प्रचंड पुरामुळे अक्कलकोट तालुक्यातील चिंचोली, केगाव बुद्रुक, कुमठे, कोर्सेगाव, मुंढेवाडी, कलकर्जाळ, धारसंघ, शेगाव, आळगे व अंकलगे या गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर हाहाकार माजला आहे.पूराच्या पाण्यामुळे शेतपिके वाहून गेली, घरांचे व जनावरांचे गंभीर नुकसान झाले असून अनेक कुटुंबे उघड्यावर पडली आहेत. नागरिकांना मोठ्या प्रमाणात हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत.आज या गावांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. प्रभावित शेतकरी व ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या. यावेळी प्रशासनाला तातडीने पंचनामे पूर्ण करून मदत व पुनर्वसनाची कार्यवाही गतीमान करण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या.सरकारने स्पष्ट केले आहे की या आपत्तीच्या काळात राज्य नागरिकांच्या पाठीशी ठामपणे उभे असून पूरग्रस्तांना दिलासा मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील.

Exit mobile version