स्वामींचे वरदहस्त: कवी अशोक नायगावकर यांचे अक्कलकोट भेटीत मनोगत
अक्कलकोट दि ५ अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात सुप्रसिद्ध कवी अशोक नायगावकर यांनी सहकुटुंब स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी आपल्या काव्यशैलीतून स्वामीभक्तीचे महत्त्व सांगत जीवनात स्वामींच्या कृपेने शांती व समाधान लाभते, असे मनोगत व्यक्त केले. मंदिर समितीच्या वतीने महेश इंगळे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी अनेक भाविक व समिती सदस्य उपस्थित होते.