मानवसेवा पॅरामेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे जिल्हास्तरीय खुल्या योगासन स्पर्धेत सुयश

मानवसेवा पॅरामेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे जिल्हास्तरीय खुल्या योगासन स्पर्धेत सुयश

छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे आयोजन

अंजनगाव सुर्जी – (ता प्र)
स्थानिक लढ्ढा कॅम्पस महेश नगर येथील मानवसेवा पॅरामेडिकल कॉलेज मधील विद्यार्थ्यांनी १८ फेब्रूवारी रोजी हनुमान व्यायाम प्रसारक मंडळमध्ये जिल्हास्तरीय खुल्या योगासन स्पर्धेत सहभाग नोंदविला.
यावेळी हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ, बृहन महाराष्ट्र योग परिषद व स्वराज्य सेवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्पर्धेत सकाळी आठ वाजता पासुन स्पर्धकांनी योगासने केली व दुपारी ३ नंतर बक्षिस वितरण करण्यात आले. बक्षिस वितरण सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून विशाल खोडस्कर, संदीप मंडाले, धनराज अढाऊ, चेतन बेलसरे उपस्थित होते. यावेळी विविध किल्यांचे पोस्टर प्रदर्शन लावण्यात आले होते.
योगासन स्पर्धेमध्ये उत्कृष्ठ योगासने केल्याबद्दल डॉ नंदकिशोर पाटील यांना सुवर्णपदक, डॉ अक्षय चौधरी यांना सुवर्णपदक, महानंदा गजबे यांना सुवर्णपदक, प्रिया पाटील यांना रौप्य पदक, अद्वय डबीर याला रौप्य पदक, डॉ अनिता कुर्मवंशी यांना कास्य पदक, साक्षी पाटील यांना कास्य पदक, आदित्य मुरकुटे यांना कास्य पदक, सारिका धामोळे यांचा चौथा क्रमांक तर परी धामोळे हिने छान विविध योगासन करुण दाखवले. यामध्ये बरेच महाराष्ट्र योगशिक्षक संघाचे पदाधिकारी आहेत. या यशाबद्दल कॉलेजचे आणि विद्यार्थ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *