लोकसेवा न्यूज

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतले अन्नछत्र मंडळात स्वामींचे दर्शन

अक्कलकोट: श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोल राजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली न्यासकडून दैनंदिन येणाऱ्या स्वामी भक्ताची सेवा ही उल्लेखनीय असून परिसरातील स्वच्छता नम्र सेवा व पर्यावरणाची जपवणूक केली जात असल्याची मनोगत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले.

ते तीर्थक्षेत्र अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळास आले असता न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त श्री अमोल राजे भोसले यांच्या हस्ते श्री ची मूर्ती कृपा वस्त्र व श्रीफळ देऊन मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला .
यावेळी ते बोलत होते.

त्यांच्या समवेत आमदार सुभाष देशमुख, आमदार सचिन कल्याण शेट्टी, पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ, शहाजी पवार यांचा देखील सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी तीर्थक्षेत्र अक्कलकोट नगरीत रुपये 368 कोटीची निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल न्यासाच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला.

Exit mobile version