लैंगिक अत्याचार करणाऱ्यांवर सामाजिक बहिष्कार टाका – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले
मुंबई दि.4 – अल्पवयीन मुली महिलांवर बळजबरी अत्याचार करून त्यांची हत्या करणाऱ्या नराधमांना कठोरात कठोर फाशीची शिक्षा झाली पाहिजे.
अजाण अल्पवयीन मुलींवर अत्याचार करून हत्या झाल्याच्या अमानुष; माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटना वाढल्या आहेत.त्या रोखण्यासाठी समाजाने जागृत राहिले पाहिजे. महिलांवर अत्याचार करणाऱ्यांवर समाजाने सामाजिक बहिष्कार टाकला पाहिजे असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी केले.
बोरिवली गोराई मधील हॉटेल बेव्ह्यू सभागृहात आयोजित क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 194 जयंती निमित्त रिपब्लिकन पक्षाच्या मुंबई प्रदेश संमेलनात प्रमुख मार्गदर्शक म्हणून ना रामदास आठवले बोलत होते.यावेळी रिपब्लिकन पक्षाच्या महिला आघाडी च्या राष्ट्रीय नेत्या सौ सीमाताई आठवले; ऍड.आशाताई लांडगे; ऍड. अभयाताई सोनवणे; उषाताई रामलू; तसेच मुंबई प्रदेश कार्यकर्ता संमेलनाच्या अध्यक्षस्थानी
रिपब्लिकन पक्षाचे मुंबई प्रदेश अध्यक्ष सिद्धार्थ कासारे ; राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर; राज्य सरचिटणीस गौतम सोनवणे ; जिल्हा अध्यक्ष रमेश गायकवाड; प्रकाश जाधव; अजित रणदिवे; सोहेल शेख ; सोना कांबळे आदी अनेक मान्यवर उपस्थित होते सूत्रसंचालन रिपाइं चे मुंबई प्रदेश सरचिटणीस विवेक पवार यांनी केले.
मुंबई महानगर पालिका निवडणूक लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे.निवडणुकांची तारीख कधीही जाहीर होवो मात्र रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी जय्यत तयारी करून सज्ज असले पाहिजे.आपापल्या भागात मुंबई महापालिका निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाची दमदार कामगिरी सिद्ध करण्यासाठी कामाला लागावे त्यासाठी मुंबई प्रदेश कार्यकारिणी ने केवळ 25 जणांची कर्यसमिती रिपब्लिकन वर्किंग कमिटी निवडण्यात यावी.मुंबईतील 50 जागांची निवड करून त्या जागा लढण्याची तयारी करावी .महायुती चा घटक पक्ष म्हणून रिपब्लिकन पक्षाला मुंबई महापालिका निवडणुकीत किमान 30 जागा सोडल्या जाव्यात असा आपणास विश्वास आहे.त्यासाठी इच्छुकांच्या मुलाखती आणि अर्ज घेण्याची सुरुवात मुंबई प्रदेश रिपब्लिकन पक्षाने करावे .आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचा निळा झेंडा फडकविण्यासाठी तयारीला लागावे असे आवाहन आज .रामदास आठवले यांनी रिपब्लिकन कार्यकर्त्यांना केले.