लोकसेवा न्यूज

‘लोकसेवा जन स्पंदन’च्या कार्यकारी संपादकपदी डॉ. रावसाहेब वाघमारे यांची निवड

‘साप्ताहिक लोकसेवा जन स्पंदन’च्या कार्यकारी संपादकपदी डॉ. रावसाहेब वाघमारे यांची निवड

पुणे प्रतिनिधी : जनहिताच्या प्रश्नांना प्रभावी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘साप्ताहिक लोकसेवा जन स्पंदन’ या वृत्तपत्राच्या कार्यकारी संपादकपदी डॉ. रावसाहेब वाघमारे यांची निवड करण्यात आली आहे.

सामाजिक, आरोग्य, शैक्षणिक तसेच ग्रामीण भागातील नागरिकांच्या विविध प्रश्नांना प्राधान्य देत वस्तुनिष्ठ, निर्भीड आणि जबाबदार पत्रकारितेला चालना देण्याचा ‘लोकसेवा जन स्पंदन’चा प्रयत्न आहे. या वाटचालीत डॉ. रावसाहेब वाघमारे यांच्यावर कार्यकारी संपादक म्हणून महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

कार्यकारी संपादकपदी डॉ. रावसाहेब वाघमारे यांची निवड झाल्याबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार आणि नागरिकांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

जनसामान्यांच्या समस्या, सामाजिक उपक्रम, शैक्षणिक घडामोडी, आरोग्यविषयक जनजागृती तसेच प्रशासनाशी संबंधित नागरिकांच्या प्रश्नांना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी वृत्तपत्राच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न करण्यात येणार आहेत.

Exit mobile version