लोकसेवा न्यूज

‘लोकसेवा जन स्पंदन’च्या मुख्य संपादकपदी बाबासाहेब वाघमारे यांची निवड

‘लोकसेवा जन स्पंदन’च्या मुख्य संपादकपदी बाबासाहेब वाघमारे यांची निवड

पुणे प्रतिनिधी : जनहिताच्या प्रश्नांना प्रभावीपणे वाचा फोडण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘साप्ताहिक लोकसेवा जन स्पंदन’ या वृत्तपत्राच्या मुख्य संपादकपदी बाबासाहेब विठ्ठलराव वाघमारे यांची निवड करण्यात आली आहे.

मुख्य संपादकपदी निवड झाल्याबद्दल बाबासाहेब वाघमारे यांचे विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार आणि नागरिकांकडून अभिनंदन होत आहे.

वृत्तपत्राच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, ग्रामीण विकास तसेच नागरिकांच्या विविध प्रश्नांना प्राधान्य देत वस्तुनिष्ठ आणि निर्भीड पत्रकारिता करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचविण्यासाठी ‘लोकसेवा जन स्पंदन’ हे प्रभावी माध्यम म्हणून कार्य करणार आहे.

Exit mobile version